अर्जुनी मोरगाव,दि.१८– तालुक्यातील कढोली,बोंडगाव,केळवद,केशोरी,परसटोला,ईळदा,तुकुम,राजोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित पक्ष बैठकीत तालुक्याच्या विकासासह जिल्ह्याच्या विकास हेच आपले ध्येय आहे.सोबतच पक्ष संघटन वाढवणे,कार्यकर्ता भेट,बुथ कमीटीचे सक्षमीकरण, पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोचवून जनतेच्या समस्या सोडविण्याची ग्वाही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून,नेते खासदार प्रफुल्ल पटेल,राष्ट्रीय महासचिव राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,तालुकाध्यभ लोकपाल गहाणे यांच्या मार्गदर्शनात आज दि.१८ रोज शनिवारला आयोजित बैठकित ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला माजी युवाध्यक्ष योगेश नाकाडे,दिनदयाल डोंगरवार,कन्हाळगावचे सरपंच जयपाल ताराम,विकास रामटेके,हबीबखा पठाण,हितेश पुस्तोडे, रामचंद्र कापडणे,बबलु दमाहे,दयाराम शेंडे,छबीलाल दमाहे,हेमराज डोंगरे, नेताजी सुकारे,नामदेव लांजेवार,प्रभु वानखेडे,गुलशन सांगोळे,भगवान देशमुख,ग्यानबा बाळबुद्धे,हरीजी देशमुख,मारोती नाकाडे,रफिकखा पठाण,रामलाल लांजेवार,नागेश मस्के तथा पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.