तीन दिवसीय योग शिबिर संजीवन निसर्गोपचार केंद्राचा उपक्रम

0
10

नागपूर (प्रतिनिधी), दि. १८ : डॉ. संजय उगेमुगे यांच्या आमगाव देवळी येथील संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्रात जागतिक योग दिनानिमित्त तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर निवासी आहे.

केंद्राचे संचालक डॉ. संजय उगेमुगे यांनी या शिबिरात प्रथम नोंदणी करणाऱ्या केवळ ३० जणांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिरात योग याशिवाय निसर्गोपचार, मसाज, स्टिम बाथ, मड बाथचा लाभ घेता येणार आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेले विदर्भातील अत्याधुनिक निसर्गोपचार केंद्र आहे. अनेक तज्ज्ञ थेरपिस्ट इथे रुग्णांवर उपचार करीत आहे. शिबिरात निवासासोबत जेवण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबिरात ऑस्टियोपॅथ उपचाराचीही सोय आहे. रविवारी सकाळी सुरू होणारे हे शिबिर २१ जून रोजी सायंकाळी ६ पर्यंत चालणार आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी डॉ. संजय उगेमुगे यांच्याशी ९६१९१११८८८ किंवा ९८२२४७००११ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.