शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल, मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल.
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.
नागपूर : नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेचा बँड हा भाजपाच्या राजकारणाचा एक अध्याय आहे. पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे. भाजपाने असा मार्ग घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय होईल. ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. ही घटना रात्रीची आहे. मुंबईला सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या सगळ्या गोष्टींची बैठकीत चर्चा केली जाईल.”
“सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बहुमताचा आकडा अजून दूर आहे. निवडणुकीत मतदानाची बंडखोरी झाली आहे. याचं आत्मपरीक्षण केलं जाईन. आज मुंबईला जाणार आहे. सगळ्या आमदारांना बोलावलेलं आहे. तिथं या सगळ्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल आणि पार्टीची बळकटी कशी करता येईल यावर काँग्रेस भूमिका घेणार आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.