मागील वर्षाचा बोनस DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्या – माजी आमदार राजेंद्र जैन

0
14

तिरोडा- स्थित कुंभारे लॉन येथे तालुका पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, सौ.राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे,प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तालुक्यातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी आगामी ग्रामपंचायत निवडणूक व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून तिरोडा तालुक्यातील गांव निहाय्य आढावा घेण्यात आला.

माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, तिरोडा तालुक्याच्या विकासासाठी खा. प्रफुल पटेल यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत आणि पुढेही विकासाची कामे होत राहतील परंतु आपण कुठे कमी पडतो याचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारमंथन करावा व आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करावा. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खा. प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे शेतकर्‍यांना धानाचा बोनस मिळाला, मागील वर्षी शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी DBT च्या माध्यमातून ६०० करोड मंजूर करण्यात आले आहे. आता सत्तेत असणाऱ्या सरकारने हे बोनसचे पैसे अजूनही दिलेले नाही याउलट मागील वर्षी बोनस दिला नाही असे जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून धापेवाडा व कवलेवाडा पाटबंधारे प्रकल्पातून हजारो हेक्टर शेतीला सिंचन झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मधून विविध पिके व उत्पादन क्षमतेत वाढ करता आली आहे. त्याचबरोबर कवलेवाडा टप्पा २ चे काम विद्यमान सरकारने लवकर सुरू करावे ही आमची मागणी आहे. कवलेवाडा टप्पा २ चे काम पूर्ण झाल्यास शेतकरी समृद्ध होईल. अडानी सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. खा. पटेल यांच्या माध्यमातून केलेल्या अनेक विकासात्मक कार्याची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जन माणसापर्यंत पोहचवावी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायत मध्ये सत्ता स्थापित करता येईल यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, अविनाश जायस्वाल, नरेश कुंभारे, अजय गौर, जिब्राइल पठाण, कैलाश पटले, किशोर तरोने, डॉ. संदीप मेश्राम, किरण पारधी, बालू बावनथडे, मनोज डोंगरे, नीताताई रहांगडाले, सुनीता मड़ावी, विजय बिंझाडे, अतुल गजभिये, रामसागर धावड़े, थानशिंग हरिनखेड़े, वा.टी. कटरे, कमलेश मिश्रा, राजू ठाकरे, बोधानन्द गुरूजी, डोमळे काका, अतुल भांडारकर, शामा शरणागत, जितेंद्र चौधरी, भूपेंद्र पटले, मुन्ना बिंझाडे, वीरेंद्र इड़पाते, देवेंद्र चौधरी, अलकेश मिश्रा, लोकेश वैध, नितीन मिश्रा, ओमेश अंबुले, रमेश भोयर, कुंदाबाई सेलोकर, भाग्यश्री कीर्वतकर, दीपक सेलोकर, निर्मलाबाई नेवारे, रामसागर धावडे, राजेंद्र बिसेन, खुशाल बोपचे, रवींद्र खरोले, नितेश ठाकरे, खिमेन्द्र चौधरी, रवींद्र बघेले, राजू गाडवे, पंजाबराव उईके, प्रेमलाल पारधी, रामलाल साठवणे, परशराम बिसेन, सुनील वैध, मंगेश बडगे, प्रभूदयाल बिसेन, दिलीप भैरम, जितेश बोडेल, बंडूभाऊ रहांगडाले, बालाराम साठवणे, डोळिराम भगत, भोजराम मेश्राम, जितेंद्र गौतम, नंदकिशोर पंधरे, प्रफुल चौधरी, सुनील चौधरी, रितेश कुमार तिडके, निखिल कुंभरे, अमर तिडके सहित तिरोडा तालुका व शहर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

तिरोडा येथील या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी लढणारे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ग्राम मंगेझरी येथील छाया टेकाम, संतोष बोपचे, शिशुपाल भोयर, प्रदीप धानगुणे, मुन्ना टेकाम, राकेश भोयर, लीकेश चुलपार, विवेकानंद परतेती, संतोष मडावी, देवराज कुंभरे, ग्राम पाटीलटोला येथील रितेश भरत तिडके, अमर तिडके, निखिल कुंभारे, भूषण तिडके, राहूल भांडारकर, प्रशांत तिडके यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. श्री राजेंद्र जैन, श्री गंगाधर परशुरामकर यांनी सर्व प्रवेशित कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले.