राज्य मागासवर्ग आयोग सदस्य यांचा गोंदिया दौरा

0
15

गोंदिया दि. 17: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 18 नोव्हेंबर रोजी गोंदिया दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायमूर्ती  चंद्रलाल मेश्राम, ऍड. बी. एल किल्लारीकर व लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी गोंदिया येथे येत आहेत. सकाळी 11 वाजता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या सोबत संयुक्त बैठक घेतली.  दुपारी 3 वाजता आयोगास प्राप्त निवेदनाच्या जात समूहाची स्थळ पाहणी करतील व सोईनुसार ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूरकडे प्रयाण करतील.