काँग्रेसच्या पायदळ मोर्च्याची विधानभवनावर धडक

0
8

.गडचिरोली- जिल्ह्यातील विविध समस्या शासन दरबारी लावण्याकरिता व जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे लक्ष वेधून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली ते नागपूर विधान भवन १७५ किलोमीटरचा ऐतिहासिक पैदल मोर्चा १४ डिसेंबर पासून गडचिरोली येथून रवाना झालेल होता. हा मोर्चा २१ डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात नागपूर विधान भवनावर धडकला. या मोर्चात जिल्ह्यातून ५ हजाराच्याच्या जवळपास शेतकरी, महिला, युवक, नागरिक नागपूर येथील विधानभवनावर धडकले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमदार सुभाष धोटे यांनी मोर्चात स्थळी भेट देऊन जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या व या समस्या सभागृहात लावून धरण्याचा विश्‍वास दिला. मोर्चेकरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्या शिवाय परत जाणार नाही असा आग्रह धरल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आणि शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या समस्या सांगितले.
मोर्चात प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव कीरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते समशेरखान पठाण, शंकर सालोटकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रा. राजेश कातट्रवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन नाट, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोटेवार, सीरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, भामरागड तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, आहेरी तालुका अध्यक्ष डॉ. पप्पू हकीम, धानोरा तालुकाध्यक्ष परसराम पदा, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, युवक काँग्रेस महासचिव विश्‍वजीत कोवासे, दिलीप घोडाम, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, एटापल्ली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन नामेवार, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, भूपेश कोलते, नंदू नरोटे, पिंकू बावणे, बाळू किणेककर, ढिवरू मेर्शाम, रामभाऊ ननावरे, वसीम शेख, निजान पेंदाम, रजनी आत्राम, यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते, जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते.