पोलिस महासंचालकांची मुरकूडोहला भेट

0
25

सालेकसा : तालुक्यातील अतिसंवेदनशिल आणि नक्षलग्रस्त असलेला मुरकूडोह येथे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी भेट दिली. भेटी दरम्यान महासंचालक रजनिश सेठ यांनी दुरक्षेत्र मुरकूडोह येथील कामकाजाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत मुरकूडोह वासीयांनी ८ वर्षांनंतर मतदानाचा हक्क बजावला आहे. या प्रक्रियेत पोलिस विभागाची भुमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे.
सालेकसा तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यातील मुरकूडोह हे क्षेत्र दुर्गम असून संवेदनशिल आहे. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत मुरकूडोह वासीयांनी ८ वषार्नंतर मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दुरक्षेत्र मुरकुडोह येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी पोलिस कामकाजाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. उपस्थित अधिकार्‍यांना काही सुचना दिल्या. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहासंचालक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे, सालेकसा पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस दुरक्षेत्र राणे, पीएसआय हत्तीमारे आदि उपस्थित होते.