38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष – खासदार प्रफुल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष – खासदार प्रफुल पटेल

0
32

blank

पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

भंडारा-पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे कार्य करावे राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष आहे. भंडारा शहराच्या विकासा करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत येणे गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविल्या तरच आगामी भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करता येईल. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षा प्रती निष्ठावंत व तरुणांना संधी देण्यात येईल, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे मार्गदर्शन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विविध सेल व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. अशी सूचना खासदार पटेल यांनी केली

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरीता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नेहा शेंडे, राहुल निर्वाण, जुमाला बोरकर, हर्षिला कराडे, हितेश सेलोकर, किर्ती कुमरे, राजेश्री राखडे, डॉ. अनिता महाजन, मंजुषा बुरडे, रजिया गेडाम, कविता रंगारी, प्रतिमा मेश्राम, पुण्यशिला कांबळे, जवाहर निर्वाण, अंबादास मंदुरकर, प्रभाकर सपाटे, संतोष श्रीवास्तव, अबु बकर हबीब, गणेश चौधरी, नारायणसिंग राजपूत, हर्षा वैद्य, सिध्दी वैद्य, जुगल भोंगाडे, प्रदीप सुखदेवे, उमेश ठाकरे, रवि लक्षणे, राजु पटेल, राजेन्द्र राखडे, आरजु मेश्राम, संजय वरगंटीवार, लोकेश नगरे, नागेश भगत, राहुल वाघमारे, शाहरुख शेख, गणेश मलेवार, नरेंद्र झंझाड, ललीत बिसेन, ईश्वर कळंबे, संजय बोंदरे, परहान पटेल, सोनु कनोजे, बंडु चेटूले, मिना नागपूरे, धनवंता बोरकर, संगिती चव्हाण, सीमा राहांगडाले, करुणा घोडमारे, लता मेश्राम, किर्ती गणविर, रत्नमाला चेटूले, संजय लांजेवार, संजोक्ता सोनकुसरे, संध्या बोदेले, राधिका भुरे, वैशाली सार्वे, रजनिश बन्सोड, जगदिश सुखदेवे, उत्तमकुमार कळपाते, राजेश डोरले, ओमप्रकाश चव्हाण, भुमेश्वर गाढवे, महेंद्र बारापात्रे, भेदे, गणेश बानेवार, मौसमसिंह ठाकूर, रुपेश टांगले, कलाम खान, सुनील विठोबाजी साखरकर, सोनल पवनकर, रत्ना मोगरे, रिता हलमारे, निशा राऊत, निलीमा रामटेके, हर्षा वैद्य, किरण वाघमारे, महेश जगनाडे, राजकुमार उताने, भोजराज वाघमारे, डॉ.जगदिश निंबार्ते, धनमाला सोनपिंपळे, बाबुराव बागडे, पंकेश काळे, सुनिल शहारे, रुपेश नंदुरकर मोठया संख्येने शहरातील पदाधिकारीव कार्यकर्ता व आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank