मी अपक्ष निवडून आलो – अपक्षच राहील- सत्यजित तांबे

0
26

नाशिक- पदवीधर मतदार संघातुन सत्यजित तांबे यांचा विजय झाला. तांबे यांनी अपक्ष निवडणूक जिंकली. पण आता सत्यजित पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होत होती. अखेर आज या सगळ्यावर सत्यजित तांबे आपली भूमिका मांडली आहे.

सत्यजित तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वावर मोठा आरोप केलाय. पक्षात, संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली. मात्र मला संधी नाकारली. वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं.विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अखेरची प्रेस कॅन्फरेन्स घेतली आणि खळबळजनक खुलासा केला आहे.माझ्या बदनामीच्या बदनाम करण्याची स्क्रिप्ट तयार होती. तांबे आणि थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव होता, असा खळबळजनक खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला? याबाबत सत्यजीत तांबे यांनी मोठा खुलासा केला आहे.

प्रदेश काँग्रेसकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म

काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला, असं सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

यापुढे अपक्ष म्हणून काम करणार
मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला.