मुंडीपार ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम

0
23

गोरेगांव:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत ग्राम पंचायत मुंडीपार येथील वार्ड क्र.2 मध्ये श्रमदानातून स्वच्छतेची चळवळ राबविण्यात आली. ही मोहिम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहणार नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते व अशीच स्वच्छतेबाबतची क्रांती ग्रामपंचायत मुंडीपार मध्ये घडत आहे असे दिसत आहे. स्वच्छ मुंडीपार अभियानात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छतेच्या कामात माजी उपसरपंच व वर्तमान सदस्य जावेद(राजा)खान,ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षीत,ग्रा.पं.सदस्य चंद्रशेखर शहारे,ग्रा.पं.सदस्य भुमेश्वरी पारधी,ग्रा.पं.सदस्य संगिता सरजारे,मुख्याध्यापक भारद्वाज, सहायक शिक्षक होमेश्वर ठाकुर,सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनी सहभागी होत स्वच्छता केली. तसेच लोकमान्य टिळक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी हातात झाडु घेऊन स्वच्छता केली.या स्वच्छता मोहिमेची सर्वांनी कौतुक केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छ मुंडीपार अभियानात मुंडीपार ग्रामवासी दररोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता करत असतात.आज दिनांक:- 04/02/2023 रोज शनिवारला श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून हातात झाळु व फ़ावळे घेऊन नालीत पडलेला कचरा बाहेर काढला, तर काही ठिकाणी हातात कुराड घेऊन झुडपे तोडली.मुंडीपार गावात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील मोकळ्या जागेतील कचरा, प्लास्टिक उचलण्यात आले.स्वच्छ मुंडीपार सुंदर मुंडीपार साठी आपले सर्वांचे प्रयत्न खुपच मोलाचे ठरणार आहे.ग्राम मुंडीपार येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,लोकमान्य शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी या मोहिमेत उतरले आहेत.रैली काढत
जोरदार घोषणाबाजीने आजच्या दिवशी सांगता करण्यात आली.