विनयभंगप्रकरणी भाजयुमो अध्यक्ष बडतर्फ

0
11

मुंबई – स्वत:च्या पक्षातील सहकारी महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. 

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. युवा मोर्चाच्या एका कार्यकर्तीने पांडे यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती. यानंतर या कार्यकर्तीचे म्हणणे अध्यक्ष शेलार व संघटन मंत्री सुनील कर्जतकर यांनी ऐकून घेतले. या घटनेची दखल घेत पांडे यांचा राजीनामा घेतला आल्याची माहिती शेलार यांनी दिली. ही बाब गंभीर असल्याने मुंबईची युवा मोर्चाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, पांडे यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वदेखील निलंबित करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारप्रकरणी कुणालाही क्षमा नाही. म्हणूनच पक्षाने पक्षांतर्गत कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे शेलार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.