शेतकरी, सैनिक, सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महाप्रबोधन यात्रा

0
9

माजी सैनिक सेल राज्यव्यापी महाप्रबोधनात्रेचे गोंदिया येथे भव्य स्वागत

गोंदिया,दि.01ः- माजी सैनिक सेल राज्यव्यापी महाप्रबोधनात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आगमन होऊन यात्रीगणांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा तळागाळात जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी व ती विचारधारा रुजविण्यासाठी या यात्रेची सुरुवात करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्र पवार,  अजितदादा पवार, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात यात्रेचे संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण होणार आहे.

आज दाखल झालेल्या यात्रेत राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, माजी सैनिक सेल प्रदेशाअध्यक्ष दिपक शिर्के, माजी सैनिक सेल प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, सिनिअर मेडिएटर मुंबई उच्च न्यायालय ॲड. संभाजीराव मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी माजी सैनिक सेल प्रवीण पेठे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.

संपूर्ण राज्यात महापुरुषांवर बेताल वक्तव्य करून जो अपमान व भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे तसेच शेतकऱ्यांचे, सैनिकांचे व सर्वसामान्य जनतेचे कैवारी आम्हीच आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न काही विशिष्ट घटकांकडून होत आहे असून तसे नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे शेतकरी, सैनिक, सर्वसामान्य जनता व समाजापर्यंत खरा इतिहास पोहचविण्याचे काम या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी हि यात्रा काढण्यात आली आहे.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, दिपक शिर्के, संभाजीराव मोहिते, बाबासाहेब जाधव, प्रविन पेठे, गंगाधर परशुरामकर, नागेश भगत, नितेश शामकुवर, राजलक्ष्मी तुरकर, राजकुमार जैन, रवी पटले, माधुरी नासरे, आशा पाटिल, रुपाली रोटकर, उषा मेश्राम, मोहन पटले, किरन बंसोड, गंगाराम बावनकर, देवीकीशन यादव, गोपाल नेवारे, सरस्वती यादव, देवाजी लक्षने, सुनील पटले, शैलेश वासनिक, शेखर पटले, कपील बावनथडे, कुनाल बावनथडे,कैलाश नागपुरे, शामराव उके, तेजस फाटक, कान्हा बघेले, रविशंकर खोटेले, मनोज बिजेवार, डी एम पटिल, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने पदाधिकरी व कार्यकर्ता उपस्थित होते.