राजकुमार बडोले आज पर्यंतचे सर्वोत्तम समाज कल्याण मंत्री : बावनकुळे

0
53

गोंदिया : भारतीय जनता पक्ष अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ४ मार्चला शक्तीकेंद्र स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा, धन्यवाद मोदीजी कार्ड संकलन, चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण, जाहीर पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला दरम्यान आपल्या भाषणात भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप ने केलेल्या कामांचा पाढा वाचला तसेच विरोधकांवर देखील टीका केली.

कार्यक्रमात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आप पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घेत नाना पटोले यांच्यावर टीका केली. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, सरपंच अनुराधाताई बन्सोड, सरपंच पंचशीलाताई मेश्राम, सरपंच महेश गहाणे, सरपंच चेतनाताई पटले, माजी पंचायत समिती सदस्य कमलेश वासनिक, सुदाम कोवे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करत आपल्या  विश्वासाला कधीही तडा जाणार नाही असे आश्वासन दिले.

राजकुमार बडोले यांच्या सारखा सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आमदार झाला, मंत्री झाला. रखडलेले ४० वर्षापासुनचे प्रश्न बडोले यांनी सोडविले. मला त्यांच्या बद्दल अभिमानाने सांगावेसे वाटते कि ते सर्वत्तोम समाज कल्याण मंत्री होते.  सोबतच  माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी ज्या ज्या मागण्या सरकार के केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या कडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे कसलीही काळजी करण्याची गरज नाही. असे आश्वासन देखील चंदशेखर बावनकुळे यांनी दिले.  प्रत्येक बूथ वरून ३ मते अधिक मिळाली असती तर आज बडोलेजी परत समाज कल्याण मंत्री असते. राजकुमार बडोले माजी झाले यात बडोले यांचे नुकसान झाले नाही. यात नुकसान जनतेचे झाले. इंदू मिल चा प्रश्न असेल किंवा दिक्षा भूमीला १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा तसेच भारतातील तरुणांना विदेशात प्रेरणा मिळावी म्हणून बडोलेजी यांनी केंद्र सरकार सोबत मिळून पाठपुरावा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर राज्य सरकार तर्फे खरेदी केले आणि अशा कार्यासक्षम नेत्याला आमदार होता आले नाही यात विधानसभा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून आपण सर्वांनी राजकुमार बडोले यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
भारतीय जनता पक्ष अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ४ मार्च २०२३ ला शक्तीकेंद्र स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा,  धन्यवाद मोदीजी कार्ड संकलन,  चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण,  जाहीर पक्षप्रवेश  व कार्यकर्ता मेळावा पार पडला दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्वश्री केशवराव मानकर अध्यक्ष भाजप गोंदिया जिल्हा, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार  सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, भाजप विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, विजय रहांगडाले आमदार तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र, भाजप प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले,पंकज रहांगडाले अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया,विरेंद्र अंजनकर संपर्कप्रमुख गोंदिया भंडारा, गोपालदास अग्रवाल,रमेश कुथे, भेरसिंह नागपुरे,खोमेश रहांगडाले,नेतराम कटरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य,इंगळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रचनाताई गहाणे प्रदेश कार्यकारिणी सदस्य,लायकराम भेंडारकर गटनेते जि.प. गोंदिया, संजय टेंभरे सभापती बांधकाम जि.प. गोंदिया,सविता पुराम सभापती, जि.प. गोंदिया,रुपेश कुथे सभापती जि.. गोंदिया, विजय शिवणकर माजी अध्यक्ष जि.प. गोंदिया, लक्ष्मीकांत धानगाये राष्ट्रीय आदि. आघाडी अध्यक्ष, विजयताई कापगते उपाध्यक्ष भाजपा गोंदिया,ग्यानिराम बारसागडे ज्येष्ठ भाजपा नेते,अन्ना पा. डोंगरवार ज्येष्ठ भाजपा नेते, ओम कटरे अध्यक्ष युवा मोर्चा गोंदिया जिल्हा,तिजेश गौतम अध्यक्ष युवा मोर्चा गोंदिया तालुका उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र यांनी परिश्रम घेतले.