राहुल गांधीवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

0
19

गोंदिया,दि.25ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वरील अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आज दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरले. आज शनिवारी पक्षातर्फे स्थानिय भोला भवन येथून गाधी प्रतिमा मार्गे गोंदिया शहर पोलीस ठाण्यासमोर पोचून तीव्र निदर्शने करून आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी देण्यात आलेल्या, ‘या मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, गांधी लढे थे गोरोसे हम लढेंगे चोरोसे, मोदी सरकार हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,अशोक गुप्ता,महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना काळे,जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे,ससेंद्र भगत,संदिप भाटिया,विमल कटरे,छाया नागपूरे,आमगाव काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार,आलोक मोहंती,बाबा बागडे,जिवन शरणागत,किसान आघाडी अध्यक्ष जितेश राणे,योगेश अग्रवाल,गौरव बिसेन,जहीर अहमद,राजू काळे,परवेज बेग आदी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.आंदोलकांनी गोंदिया शहर पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर केले.