केमिकलमध्ये नोटा डबल होतात अशी फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींना अटक

0
29

गोंदिय़ा,दि.25ः- जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या कोरणी घाट परिसरात एका केमिकलमध्ये नोटा ठेवल्यात त्या काही तासात डबल होतात अशी बतावणी करून फसवणूक करणाऱ्या 5 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच गजाआड करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

सविस्तर असे की, 24/03/2023 रोजी पोलीस ठाणे रावणवाडीचे सपोनि- सरवदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांना सातोना येथील इसम दिपांशु ब्रिकचंद उरकुडे यांना काही लोकांनी 10,000 रु च्या नोटा एका केमिकलं मध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटामधून अडीच लाख रुपये तयार होतात अशी बतावणी केली.त्यानंतर फिर्यादी कडून् 10,000/- रुपये घेऊन एक केमिकल टाकलेले नोटांचे बन्डल् पॅक करून फिर्यादीला दिले.व 2 तासांनी उघडून बघायला सांगितले.2 तासानंतर फिर्यादीने सदर बंड्ल् उघडून पाहिले असता त्यात कागदी नोटा दिसून आल्याने आपली फसवूणक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याचे सांगितले.सदर आरोपींनी फिर्यादीची फसवणुक करून त्याचाकडील 10,000/- रूपये रोख रक्कम घेवून पांढरे रंगाची स्वीफट चारचाकी कार क्र. CG 12 AR 7194 ने गोंदियाच्या दिशेने पसार झाल्याचे सांगितले.ही माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखुन चारचाकी मधून पसार झालेल्या गुन्हेगारांचे शोध घेवुन गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करुन तपासाला सुरवात केली असता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बालाघाट टी पॉईट,गोंदिया येथे सापळा रचून नाकाबंदी करून 24/03/2023 रोजी 18.00 वाजेच्या सुमारास बालाघाट टी पॉइंट येथे पांढरे रंगाची स्वीफट मोटर कार क्र. CG 12 AR 7194 रावणवाडी कडून गोंदियाच्या दिशेने येताना दिसून आली.सदर चारचाकी कारमध्ये 5 इसम संशयितरित्या आढळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली.यातील  पिंटूट्कुमार सुंदरलाल बारमाटे वय 32,पत्ता-ए-46, मलाजखंड वार्ड क्र 20,जि. बालाघाट,दुर्गेश सिताराम मरसकोल्हे वय 30,पत्ता- बंजारीटोला,ता.बिरज,जि. बालाघाट,सियाराम महिपाल चौधरी 42 वर्ष, पता- सतोना, ता.जि. गोंदिया,राजेश अमरलाल नेवारे 30 वर्ष पत्ता-बालघाट, ता.सिरसा,जि.बालाघाट व विष्णु बाबुलाल पंधरे वय 42 पारगाव, ता. किरणापूर, जि.बालाघाट यांना ताब्यात घेवून दिपांशु उरकुडे यांचेबाबत घडलेल्या फसवणुकीच्या गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता, नमूद 5 ही इसमांनी फसवणूक केल्याचे सांगून गुन्हाची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.तसेच त्यांच्या ताब्यातून 10 हजार रुपये रोख रक्कम व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.पाच ही संशयीत गुन्हेगारांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे रावणवाडी येथील अप. क्र. 67 / 2023 कलम 420, 34 भारतीय दंड विधान गुन्ह्यात पुढील कायदेशीर कारवाई होण्यास पोलीस ठाणे रावणवाडी पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पो.नि.दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय शिंदे, स.पो.नि. सरवदे , मपोउपनि वनिता सायकर, स. फौं. अर्जुन कावळे, पो. हवा. चित्तरंजन कोडापे, इंद्रजि त बिसेन, पो. शि. संतोष केदार मपोशी स्मिता तोंडरे यांनी अथक परिश्रम घेवून पार पाडली.