राहुल गांधी विरोधात भाजपचे गोंदियात आंदोलन

0
11

गोंदिया, 25 मार्च-भारताच्या संविधान विरोधात कृती करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षा विरोधात आज शनिवार, 25 मार्च रोजी गोंदिया शहर भाजपच्या वतीने आक्रमक भूमिका घेत निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात आले.
भाजप जिल्हा कार्यालयातून राहूल गांधी व काँग्रेस विरोधात घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर चौकापर्यंत निषेध मोर्चा काढला. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यावर राहूल गांधी व काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी माजी आ. संजय पुराम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, अनूसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जे. डी. जगणीत, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण चांदवानी, अशोक चौधरी, मनोहर आसवानी, माजी नगर परिषद सभापती राजकुमार कुथे, जितेंद्र पंचबुद्धे, ॠषीकांत शाहू, बाबा बिसेन, सतीश मेश्राम, शंभूशरणसिंह ठाकूर, अशोक हरिणखेडे, धनंजय रिनायत, शालीनी डोंगरे, गोल्डी गावंडे, अंकित जैन, कुणाल बिसेन, तिजेश गौतम, चंद्रभान तरोणे, राजेश बिसेन, योगेश सोलंकी, व्यंकट पाथरु, पुरुषोत्तम ठाकरे, राकेश अग्रवाल, सुशील राऊत, धमिर्र्ष्ठा सेंगर, पुजा तिवारी, पंकज भिवगडे, अमर रंगारी, संतोष कुसराम, अमित आर्य, अमरसिंग राजपूत, लोकेश उपराडे, प्रतिक मिश्रा, मंगलेश गिरी, किर्तीलाल कटरे, महेंद्र शहारे, विजू शेंद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.