तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध सभेचे आयोजन

0
31

देवरी,दि.२५: सुरत येथील न्यायालयाने शुक्रवारी ( दि.२४ मार्च) रोजी एका प्रकरणात काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी तातडीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय शनिवारी( ता. २५ मार्च) रोजी घेतला यावरून विदर्भासह गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा निर्णय देशातील लोकशाही संपल्याचे व हुकूमशाही सुरू झाल्याचे द्योतक आहे. अशा भावना व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज शनीवार( ता.५ मार्च) रोजी देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी देवरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य संदीप भाटिया हे होते. या प्रसंगी जि.प.सदस्य उषा शहारे, राधिका धरमगुळे, तालुका महिला अध्यक्ष सुनंदा बहेकार, देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, पं.स. सदस्य प्रल्हाद सलामे, भारती सलामे, जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दीपक(राजा) कोरोटे, नगरसेवक बबलु कुरैशी, कुलदीप गुप्ता, अविनाश टेंभरे, सिमा कोरोटे, जैपाल प्रधान, छगन मुंगणकर, सुरेन्द्र बांसोड,घसरण धरमगुळे, अमित तरजुले यांच्या सह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनंदा बहेकार, ओमप्रकाश रामटेके, उषा शहारे व संदीप भाटिया यांनी या सभेला संबोधित करतानी म्हटले की, राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदी सारख्या भ्रष्ट लोकांविषयी आपली भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लुटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भीतीपोटीचा त्यांना अडकवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा खून आहे, याचा आम्ही निषेध करतो असे म्हटले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार अमित तरजुले यांनी मानले.