भंडारा : चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसपी पक्षाची विदर्भातील अनेक माजी आमदारांना भुरळ पडली आहे. तेलंगणातील विकास पाहून तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे हेसुद्धा बीआरएसपी पक्षाच्या संपर्कात होते. महाराष्ट्रासह जिल्ह्यातही अशा विकासाची पाळेमुळे रुजवावी यासाठी चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.
हैदराबाद येथील मुख्यमंत्री केसीआर यांच्या शासकीय निवासस्थानी काल माजी आ. वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षप्रवेश केला. नवभारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाचे मुळ उद्दिष्ट असल्याने या पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.





