बाजार समितीवर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल व काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलचा झेंडा
गोंदिया,दि.29- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीकरीता शुक्रवारला झालेल्या मतदानाची मतमोजनी आज(दि.29) शनिवारला करण्यात आली.या मतमोजणीत प्रस्थापित सत्ताधारींना धक्का देत अपक्ष आमदार विनोद अग्रवाल व काँग्रेसच्या परीवर्तन पॅनलने 18 पैकी 14 जागा जिंंकून बाजार समितीची सत्ता आपल्या हाती घेतली आहे.या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या भाजप राष्ट्रवादी आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. 

परिवर्तन पैनलच्यावतीने धनंजय तुरकर, भाऊराव ऊके, मुनेश रहांगडाले, जितेश टेंभरे,राजकुमार(पप्पू) पटले, अरुण गजभिये, शामकला पाचे, मुरली नागपुरे,सौ.कौशल छत्रपाल तुरकर आदिसह 14 उमेदवार विजयी झाले आहेत.शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पंकज यादव हे सेवा सहकारी गटातून विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या सहकार पैनल (बीजेपी-राकांपा) ला पराभवाचा मोठा फटका सहन करावा लागला.सहकार पैनलचे एकमेव उमेदवार कृउबास माजी उपसभापति धनलाल ठाकरे निर्विरोध विजयी झाले होते.




