23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home राजकीय तिरोडा बाजार समितीवर आ.रहागंडालेच्या नेतृत्वात भाजपचे वर्चंस्व

तिरोडा बाजार समितीवर आ.रहागंडालेच्या नेतृत्वात भाजपचे वर्चंस्व

0
37

गोंदिया,दि.29ः जिल्ह्यातील तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज(दि.29)पार पडली.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली असून आमदार विजय रहागंडाले यांच्या नेतृत्वात 18 पैकी 10 जागा जिंकून एकहाती विजय मिळविला आहे.या निवडणुकीत भाजप 10,राष्ट्रवादी काँग्रेस 4,काँग्रेस 3 व अपक्षाने 1 जागा जिंकली. बाजार समितीच्या सेवा सहकारी गटात ओम पटले (काँग्रेस),रमेश टेंभरे (काँग्रेस),रामसागर धावडे (राष्ट्रवादी),मनिषा पटले (राष्ट्रवादी),दुर्गाप्रसाद कोठे (राष्ट्रवादी),अनिल भगत (राष्ट्रवादी), जितेंद्र राहंगडाले (भाजपा),प्रतिमा सुभाष जैतवार (भाजपा),भूमेश्वर राहंगडाले (भाजपा),डॉ. गोवर्धन चव्हाण (भाजपा) व जयप्रकाश गौतम (भाजपा) विजयी झाले.व्यापारी गटात भूषण झरारिया (भाजपा),शरद अग्रवाल (अपक्ष),ग्रामपंचायत गटातून रवींद्र वहिले (भाजपा),मिलिंद कुंभरे (भाजपा),घनश्याम पारधी (भाजपा),मदन पटले (काँग्रेस),हमाल तोलारी गटातून ललिताबाई नागरिकर (भाजपा) विजयी झाले.