आमगाव येथे मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन

0
9
  • आमगाव, दि.२६: आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्राची २०२३-२४ या मान्सून पूर्व आढावा बैठक आमगाव येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरूवार (ता. २५ मे)रोजी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संबंधीत सर्व विभागाच्या अधिका-यांना मान्सून पूर्वं तैयारी करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीत देवरी,आमगावं व सालेकसा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन संबंधी सर्व विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. आणि यावेळी संबंधीत सर्व विभागाच्या अधिका-यांना मान्सून पूर्वं तैयारी करण्याचे निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी आमगाव तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संजय बहेकार, जि.प.सदस्य उषाताई मेंढे, छबुताई उके, आमगावंचे तहसीलदार आर.एम. कुंभरे, देवरीचे तहसीलदार संतोष महाले, सालेकसाचे तहसीलदार कोंडागुरले, आमगावच्या गटविकास अधिकारी आयचीत मॅडम, पं.स.सदस्य नंदु कोरे, इंजि. तारेंद्र रामटेके, तीगाव चे पत्रकार नरेश बोपचे यांच्यासह सर्व विभगातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.