महिला सक्षमीकरण अंतर्गत १५ बचतगट भवन बांधू – आ.कोरोटे

0
10

◆ देवरी येथे शासन आपल्या दारी या अंतर्गत पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन.
———————————————
देवरी, ता.३०: शासन आपल्यादारी या अंतर्गत स्त्री शक्ती समाधान शिबीर हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहे. हा एक छान उपक्रम आहे. देवरी परिसरातील माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी बसल्या आहेत. आपण सर्वांनी शासनाच्या योजनांच्या लाभ घेतला पाहिजे. मी ही महिलांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने देवरी तालुक्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाची साठवणूक व विक्री चांगल्या प्रकारे व्हावी या करिता तालुक्यात प्रत्येकी २५ लाख रूपयाचे १५ महिला बचत गट भवन तैयार करण्याचा संकल्प केला आहे. ह्या सर्व बचतगट भवनाचे एक महिल्यानंतर भूमिपूजन करणार आहोत असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवार ( ता.२९ मे. ) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महीला माता भगिनींना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
सदर शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि देवरीचे तहसीलदार सावंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम, देवरीच्या सभापती अंबिकाताई बंजार, कांग्रेस पक्षाचे जि.प. गटनेते संदीप भाटिया, जि.प.सदस्य मा. उषाताई शहारे, देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, पंचायत समितीचे सदस्य शामकलाताई गावड, वैशालीताई पंधरे,भारतीताई सलामे, प्रल्हादजी सलामे, नगरसेवीका सुनिताताई शाहू, सीताताई रंगारी, शिबिराचे सदस्य सचिव तथा बालविकास अधिकारी संतोष वर्पे तसेच तहसील कार्यालय देवरी येथील कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशावर्कर बचत गटाच्या सन्माननीय सदस्य यांच्यासह महसूल विभाग, आरोग्य विभाग , कृषी विभाग, समाज कल्याण विभाग , शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग ,पंचायत समिती, मा.वि.म., उमेद, आदिवासी विभाग, नगरपंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, पुरवठा विभाग येथील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व शासकिय विभाग व ईतर विभागांच्या सहकार्याने शिबिरांमधील महिलांना शासनांच्या योजना विषयक माहिती सांगून व त्यांच्या समस्या घेऊन समस्यांचे निराकरण करण्यात आले.
दरम्यान आमदार सहषराम कोरोटे, सभापती सविताताई पुराम, देवरीच्या सभापती अंबिकाताई बंजार जि.प.सदस्य संदीप भाटिया, उषाताई शहारे,नगराध्यक्ष मा. संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, आणी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सावंत पवार यांनी लाभार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, शिवाय मान्यवरांच्या हस्ते व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना गुंतवणूक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.आणि पुरवठा विभाग अंतर्गत काही लाभार्थ्यांना राशन कार्ड वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिबिराचेअध्यक्ष तथा तहसीलदार सावंत पवार यांनी तर संचालन सुपरवाईजर कुंती नेताम यांनी करूण उपस्थितांचे आभार मानले.या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिरास देवरी तालुक्यातील महिला लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.