सितेपार येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे तिन लोकांचे घर जळाले

0
11

◆ आमदार सहषराम कोरोटे यांची आर्थिक मदत
आमगावं,ता.३०:आमगाव तालुक्यातील सितेपार येथील गुणेश्वर बिसेन, रमेश बिसेन, निर्मलाताई बिसेन या तिन्ही लोकांच्या घराला शुक्रवार (ता.२६ मे.) रोजी जी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे यांचे संपूर्ण घर जळाले. या घटनेची माहिती मिळताच आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी सितेपार येथील तिन्ही लोकांच्या घराला सोमवारी (ता.२९ मे.)रोजी भेट देऊन घराची पाहणी केली. आणि बिसेन परिवाराला सात्वना भेट देऊन आर्थिक मदत केली आणि शासनाकडून मदत मिळावी म्हणून संबंधित विभागाला सूचना दिल्या.
याप्रसंगी आमदार कोरोटे यांच्या सोबत उपस्थित आमगावं तालुका कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष भोजराज जैतवार, सितेपारचे सरपंचमा. देवराव बिसेन, कांग्रेसचे आमगाव येथील अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष रामेश्वर शामकुवर, सितेपारचे उपसरपंच सुरेश चौधरी, ग्रा.पं. सदस्य सेवकराम चौधरी, सितेपारचे ग्राससेवक प्रशांत उईके, मुकेश बिसेन, होलीराम बिसेन, राजेंद्र रहांगडाले, नरेशभाऊ बिसेन, मुकेशभाऊ बागडे, संतोष पातोडे, रज्जत कावळे, भोजराज बिसेन, लोकनाथ हरिनखेडे, कैलाश कावळे, संतोष पातोडे, कैलाश हरिनखेडे, मुन्नालाल हरिनखेडे, राजेंद्र मेश्राम, कैलाश मरकाम, टेकचंद हरिनखेडे, खोबाराम कावळे, सुकराम मरकाम, घनशाम रहांगडाले, टेकचंद मडावी, सुकचंद मडावी, आकाश मरकाम, रुपेश्वर बिसेन यांच्यासह सितेपारचे बहसंख्य गावकरी लोक प्रामुख्याने उपस्थित होते.