39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय काँग्रेस चे सरकार आल्यास जातीय जनगणना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर

काँग्रेस चे सरकार आल्यास जातीय जनगणना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर

0
22

blank

या वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सत्ताधारी भाजपशिवाय काँग्रेसनेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी मध्यप्रदेशमध्ये दाखल झाले. यावेळी सतनामध्ये सभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक घोषणा केल्या.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजय झाल्यास मध्य प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. तसेच, आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. एलपीजी सिलिंडर फक्त ५०० रुपयांना मिळेल. तसेच, महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. याशिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना आणली जाणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज बिल घेतले जाणार नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

blank