माजी आमदार संजय पुराम यांनी दत्तक घेतलेले फुटाना गाव विकासापासून वंचित

0
11

आम्ही हुर्दंड आणि फोकनाड गोष्टी करित नाही तर विश्वासाने विकास कामे करतो.

आमदार कोरोटे यांचे प्रतिपादन.
आमदार कोरोटे यांनी फुटाना गावात आणली विकासाची गंगा.
फुटाना येथे विविध विकास कामाचे भुमिपूजन व लोकार्पण.

देवरी,ता.२६: गेल्या २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांनी विकासाचा मोठा वाजा गाजा करीत फुटाना हे गाव दत्तक घेतले होते. मात्र, या गावात त्यांनी या काळात एकही विकास कामे केली नाही. नाव मोठे दर्शन खोटेचा प्रत्यय दिला. त्यामुळे या गावातील नागरीकांमध्ये पुराम यांच्या विरूध्द रोष आहे. पण या गावातील नागरिकांच्या मागणीनुसार मी स्वत:संबधित विभागाशी पाठपुरावा करून सी.एम.जी.एस.वाय अंतर्गत फुटाना ते पलानगाव या रोडचे एकूण ५ कोटी ५८ लाख रूपयाचे तर ग्रामविकासाच्या निधीमध्ये ३० लाख रूपयाचे रोड व स्थानिक आमदार विकास निधीतून १५ लाख रूपयाचे रोड आणि १० लाख रूपयाचे समाज भवन व ३ लाख रूपयांची चावडी अशी विविध विकास कामे फुटाना या गावासाठी खेचून आणली. आज फुटाना येथील नागरिकांच्या रोड व रस्त्याची समस्या दूर केली तर या सर्व कामांचे भुमिपूजन आणि लोकार्पणाचे कार्य पूर्ण केले. अशाप्रकारे आम्ही हुर्दंड आणि फोकनाड गोष्टी करित नाही तर विश्वासाने विकास कामे करतो, असे प्रतिपादन या क्षेत्राचे विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.

ते देवरी तालुक्यातील फुटाना या येथे गुरूवारी (दि.२४ ऑगस्ट ) रोजी आयोजित विविध विकास कामाचे भुमिपूजन, लोकार्पण व व्रुक्षारोपण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी उपस्थित गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते संदीप भाटिया, जि.प. सदस्य उषा शहारे, धरमगुडे, पं. स. सदस्य भारती सलामे, प्रल्हाद सलामे, फुटानाचे सरपंच कमलेश नंदेश्वर, उपसरपंच मीना देशमुख, माजी सरपंच नूतन बन्सोड, टेकचंद हिडको,माजी पं.स.सदस्य ओमराज बहेकार युवक कांग्रेसचे विधानसभाध्यक्ष दीपक कोरोटे, बळीराम कोटवार, पोलिस पाटील कृष्णा भोयर, प्रेमनाथ देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गहाने, नेतराम बडवाईक, गजानन काकडे, तुलाराम कराडे, संदीप मोहबीया यांच्यासह फुटाना परिसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, महिला व पुरूष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार कोरोटे पुढे म्हणाले की, फोकनाड कामे करीत नाही आणी समाजात दुजाभाव न करता फक्त गोरगरीब सर्व सामान्य नागरीकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे या साठी पर्यत्न करतो. पुढे केन्द्र सरकार वर हल्ला चढवित ते म्हणाले की, आज या देशात एवढ्या मोठ्या महागाईच्या परिस्थितीत घरगुती गँसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तर हे दर ४४० रूपये होते. आणि यामधून सबसिडीपण परत मिळायची. पण या भाजपच्या मोदी सरकारने ह्या सर्व सोई सुविधा बंद करूण गँस चे दर हे १२०० रूपयाच्यावर केलेला आहे. त्यामुळे सर्व माता भगिनी मध्ये केन्द्र सरकार विरूध्द आक्रोश आहे असे म्हटले.
दरम्यान आयोजकांनी आमदार कोरोटे यांचा शाल व श्रीफळ भेट देऊन सत्कार केले. तसेच गावातील काही महिला पुरूषांनी निवेदन देऊन आणखी नव्या एका सभा मंडपाची मागणी केली. यावर आमदार कोरोटे यांनी सदर कामे लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली.