सडक अर्जुनी: सडक अर्जुनी कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक, सावंगी येथील युवा उद्योजक हरिष बन्सोड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मुंबईच्या प्रदेश कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश महामंत्री देवानंद पवार उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये काम करीत होते.मात्र भाजपाची विचार धारा बहुजन समाजाचा घात करणारी असल्यामुळे आज भाजपाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रसंगी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रोशन बडोले, सामाजिक कार्यकर्ते शंकर मेंढे, चिखली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुधाकर कुर्वे,सुधीर शिवणकर, सुमेध बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते.