महाराष्ट्राची असंवैधानिक ईडी सरकार मराठा समाजावर लाठीमारी करत आहे: इंजि राजीव ठकरेले
गोंदिया,दि.04- मोदी सरकारच्या नऊ वर्षात केलेल्या भ्रष्टाचार व असामाजिक कृत्यांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या निर्देशनाने जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले. त्यात गोंदिया तालुक्यातील यात्रेचा शुभारंभ आज दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील आसोली येथून करण्यात आले.यात्रेचा शुभारंभ ग्राम पंचायतचे उपसरपंच दिनेश पंधरे व गाव काँग्रेस प्रमुख श्रीकांत बंसोड यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा दाखवून करण्यात आली.यात्रेत प्रामुख्याने प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे,काँग्रेस सेवादल प्रदेश सहसचिव इंजि राजीव ठकरेले,किसान काँग्रेस जिलाध्यक्ष जितेश राणे,माजी पंचायत समिती सदस्य बंटी बेलावे तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत,महिला तालुकाध्यक्ष अनिताताई मुनेश्वर,विजय बहेकार,सुरेश चौरागडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले,एनएसयूआई जिला अध्यक्ष हरीश तुलसकर, शहर महासचिव आलोक मोहंती, तालुका महासचिव रंजीत गणवीर, सेवादल तालुका प्रभारी नामदेव वैद्य, ग्रामपंचायत सदस्य राजू गणवीर, परमेश्वर ऊके, सेवा सहकारी संचालक दिलीचंद दुर्वे, प्रकाश ब्राह्मणकर, तेजराम फूंडे, अनिरुद्ध गायधने, महेंद्र गड़पायले, अरविंद बनसोड, विजय बन्सोड, रमेश हूमे, तुळशीराम उके, बिरज गायधने, चेतन मेश्राम, सुदर्शन मेश्राम, अरुण बंसोड, विनोद बन्सोड, रवी वासनिक, वसंत मेश्राम, नरेश रामटेके, शुभम मेश्राम, विजय कटरे इत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होतें.
यात्रेचे संचालन इंजि राजीव ठकरेले यांनी केले व कार्यकर्तेंचे आभार बंटी भेलावे यांनी मानले.