मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या बाजूने मी नाहीच ंप्रदेशाध्यक्ष नाना पटोले

0
15
गोंदिया- राज्यात सध्या ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे तसेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्याच्या मागणीला घेऊन जे आंदोलन सुरु आहे.त्या आंदोलनाचे पाप हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे आहे.भाजपनेच मराठ्यांना चुकीच्या पध्दतीने आरक्षणाकरीता हुलकावणी लावल्याचा आरोप करीत आपण कधीही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही.उलट सरकारने जातीय जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात काय तो निर्णय घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांननी म्हटले आहे.पटोले हे गोंदिया शहरात जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले की,जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत या समस्येचा निकाल लागणार नाही.त्यातच ५० टक्केची आरक्षणावर लावलेली मर्यादा हटविण्यात यावे.राज्यातील सरकारचे केंद्रातील सरकार एैकत असल्याने येत्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 50 टक्केची मर्यादा काढून टाकण्याकरीता राज्य सरकारने प्रधानमंत्री यांच्याकडे मागणी करुन जनगणन करावी असेही म्हटले.आपण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे असे कधीच बोलले नाही.विरोधी पक्षाचे आमदारांना कमी एैकायला जाते त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.सारथी संस्थेतील कुणबी समाजाच्या समावेशावर मात्र साऱथीमध्ये कुणबी समाज नसल्याचे पटोलेंचे म्हणने आहे.
काँग्रेसच्या रायपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनातही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पारीत करण्यात आला असून मुंबई येथे पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकार येताच जातनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा ठेवला आणि त्यास सर्वच पक्षांनी समंतीही दर्शविल्याचे पटोले यांनी सांगितले.
सोबतच राज्यातील सरकारला दिड दोन वर्षात पुर्ण मंत्रीमंडळाचे गठण करुन पालकमंत्री नेमता आले नाही याशिवाय दुसरे दुर्देव नसल्याचे टिका करीत राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक योजनांंवर निर्णय होत नसल्याचेही म्हणाले.भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवण्याची भिती दाखवून आपल्या पक्षात आणने किंवा सोबत आणण्यावर देशातील हुकूमशहाचे काम सुरु असल्याचेही पटोले म्हणाले.