देवरी,दि.14: जिल्हाचा अंतीम टोकावर असलेल्या अतीदुर्गम आदिवासी नक्षल क्षेत्र म्हणुन ओळख असलेल्या गट ग्रामपंचायत मिसपिर्री येथे दरवर्षीप्रमाणे गाव परीसरातील दहावी व बारावी बोर्डाच्या शालांत परिक्षेत्र उत्तीर्ण होऊन गुणवंत प्राप्त करनाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देवून सत्कार करण्याचा कार्यक्रम मंगळवार रोजी पार पडले. हा कार्यक्रम “सत्कार गुणवंताचा वाटचाल प्रगतीचा” या अभिनव उपक्रमातून राबविन्यात आले.ग्रा.पं. परीसरातील दहावी व बारावी च्या बोर्ड परिक्षेत्र गुणवंत प्राप्त करना-या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविना-या विद्यार्थ्यांना, सन्मान चिन्ह, प्रस्तीपत्र, शाल, श्रीफळ व अनुक्रमे प्रथम १५ हजार., द्वितीय १० हजार व तृतीय ५ हजार रू. रोख रक्कम पुरस्कार देवून गौरांवित करण्यात आले.
यात इयत्ता . बारावी मधून कु. आरती रेखूलाल कुंभरे, प्रिया रामलाल उसेंडी, कु. ओझल अशोक वाल्दे तर इयत्ता दहावी मधून कु· महक अशोक वाल्दे,जान्वी शामराव कुमेटी, निशा नरेश मड़ावी हया विद्यार्थीनी सत्काराचे मानकरी ठरले.
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.ककोडी क्षेत्राचे सदस्य अनुसयाताई सलामे, या प्रसंगी माजी सरपंच, दुर्गेश कुंभरे, गिरधारी कळसाय, मिसपिर्री केन्द्रातील शिक्षक आशिष रंगारी सर, श्री संदीप मेश्रामसर, लांजेवारसर,देवानंद गोबाडेसर,शरद शेंडेसर, सुजित सूर्यवंशीसर ,जागेश्वर वल्केसर,श्री पुरामसर, स्वयंसेवक सुरेश दर्रो सर, श्रीहोळी सर यांच्यासह गट ग्राम पंचायत मिसपिर्री परिसरातील पालकवर्ग, शाळेतील विद्यार्थी व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्याआयोजनाकरीता सरपंच रसवंती उसेंडी,उपसरपंच, जीवन सलामे ग्रा.प.सदस्य खेमराज वाल्दे, संतोष नरेठी, श्रावन सिंद्राम, हेमत कुंभरे, कमलाबाई सयाम,
सुमित्रा नेताम, नितू हलामी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघमारे ग्राम विकास अधिकारी , ग्रा.पं. कर्मचारी गजेन्द्र हिरवानी, सुखराम सलामे संदीप धमगाये व गणेश दर्रो यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमात यावेळी प्रास्ताविक उपसरपंच जीवन सलामे यांनी तर आशिष रंगारी सर मुख्याध्यापक मिसपिरी, देवानंद गोबाडे सर आणि दिपक लांजेवार सर यांनी मनोगत व्यक्त केले व गुणवंताचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांत बडोले सर यांनी तर उपस्थितांचे आभार मनोज बड़वाईक यांनी मानले.