संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला -चित्रा वाघ

0
7

गोंदिया : संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात. महाराष्ट्रातील आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांच्या दारी जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे सरकार आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.

स्वातंत्र्याची ७५ वर्षे भारतीय संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम भारत सरकार राबवित असून गोंदिया शहरातदेखील भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थित गोंदियात लोकांच्या दारावर जाऊन ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमासाठी माती संकलन करण्यात आली,याप्रसंगी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
उद्धव ठाकरे यांना आपण विदूषकचे कपडे पाठविले होते. हा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारले असता आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका कराल तर, अभी तो पिक्चर बहोत बाकी है, असे म्हणत भाजपा महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरीरावरून टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना विदूषकचे कपडे पाठविले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरयष्टीवरून टीका करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमच्या नेत्यांच्या टीवल्या-बावल्या करतात आणि लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे विदूषक करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकचे कपडे आम्ही पाठवले, असे चित्र वाघ म्हणाल्या.