चारचाकीने तिघांना चिरडले, सैन्य अधिकाऱ्यासह तीनजणांचा मृत्यू

0
5

भंडारा : भरधाव वेगाने आलेल्या टोयाटो ग्लांझा या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना एकाच वेळी जबर धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाराजवळील खुर्शिपार येथे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.एका सैन्य अधिकाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. नागेश्वर बालपांडे, वय ३४, रा. सातोना, हरगोविंद क्षीरसागर, वय ४५ रा. पाहुणी, विनोद भोंदे, वय ४७ रा. मोहदुरा यांचा अपघात मृत्यू झाला. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम येथे सैन्यदलात कार्यरत असून ते सुट्टीवर गावाकडे आले होते. या अपघातात चारचाकी वाहनातील दोघे गंभीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.