भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर ओम कटरे यांची पुन्हा निवड

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया –जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कर्मठ,कर्तबगार,दमदार युवा नेतृत्व ओम कटरे यांची पुन्हा दुसऱ्यांदा गोंदिया जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीने जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. तिरोडा तालुक्यातील चिरेखणी गावातील रहिवासी असून 2005 पासून निरंतर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.संघाची पार्श्वभूमी असलेले ओम कटरे यांचा बजरंग दल कार्यकर्ता ते युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असा प्रवास राहिलेला आहे.2007 ते 2010 पर्यंत बजरंग दलचे तालुका विस्तारक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सक्रिय राहिलेले आहेत.2013 व 2016 ला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दोनदा जबाबदारी पार पाडली. व उपाध्यक्ष असतानी केलेल्या पक्ष कार्याच्या जोरावर त्यांची 2019 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष असतानी संपूर्ण जिल्ह्यात सतत प्रवास ,बैठका,युवा मोर्चा बांधणी ह्या सर्व कार्यामुळे जिल्ह्यातील युवक एक आदर्श नेतृत्व म्हणून  ओम कटरे यांच्याकडे बघत आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार व आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या द्वारा आयोजित सिएम चषक महोत्सव, नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार व खासदार सूनील मेंढे द्वारा आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव, विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहेत.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानी सामान्य परिवारातून निघालेला नेतृत्व राजकारणातील भारतीय जनता पक्षाचा भविष्यातील चेहरा म्हणून समोर येत आहे.जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची पावती म्हणून पक्ष श्रेष्ठींनी 2023 मध्ये पुन्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. पुनःश्च नियुक्त केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राहुल लोणीकर,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर,बाळा भाऊ अंजणकर, खा.सूनिल मेंढे , माजी मंत्री परिणय फुके,आ.विजय रहांगडाले,जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, माजी मंत्री राजकुमार बडोले,हेमंत पटले,पंकज रहांगडाले संजय कुलकर्णी ,केशवराव मानकर,तथा सर्व पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले.भारतीय जनता पक्षातर्फे ओम कटरे यांच्या पूनर्नियुक्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले.