सोमलपुर येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
12

अर्जुनी मोर. :– तालुक्यातील सोमलपुर येथे मग्रारोहयो अंतर्गत मंजुर असलेल्या गाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे हस्ते ता.19 ला करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी सोमलपुर गट ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.भुमिताताई ढोक होत्या.यावेळी उपसरपंच उल्हास लेंडे,माजी सरपंच लिलेश्वर खुणे,ग्रामपंचायत सदस्य रेखाताई झोळे,शक्तीकेंद्र प्रमुख पुरुषोत्तम हातझाडे,नंदु कापगते,चंदू झोळे,जैराम हातझाडे,सुरदास लेंडे,ग्रा.पं.कर्मचारी लेखराम ठाकरे , विनोद नाकाडे,बंडुभाऊ सोनवाने व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी या विभागाचे जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी सोमलपुर गावात अजुन जी काही विकासाची कामे प्रलंबीत आहेत.ती कामे पुर्ण करुन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन देऊन सोमलपुर गावात नव्यानेच निर्माण वाचनालयासाठी आलमा-या व पुस्तकांची व्यवस्था सुध्दा करुन देण्याचे आश्वासन दिले.