गोंदिया : जिल्हा व शहर काँग्रेसने आज उपविभागीय कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध आंदोलनात प्रदेश सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे,डेमेंंद्र रहागंडाले,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,गोंदिया बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले,सुर्यप्रकाश भगत,एड.योगेश अग्रवाल,राजू काळे,जहीर अहमद,चित्रा लोखंडे,सुनिल भोंगाडे,सुरेश चौरागडे,राजीव ठकरेले,आनंद लांजेवार आदी सहभागी झाले होते.काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या छायाचित्राशी छेडछाड करून त्या छायाचित्राला रावणाची उपमा देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. हे छायाचित्र भाजपने समाजमाध्यमात प्रसारित केले आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपने नैराश्यातून हे कृत्य केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली. तसेच राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांना हुकुमशाही मोदी असे संबोधण्यात आले.