राष्ट्रवादी आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये दाखल

0
17

दे्वरी,दि.९- सालेकसा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काल रविवारी (दि.८) अधिकृतरीत्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

सालेकसा तालुक्यातील गडमाता मंदिराच्या भव्य आवारात पक्ष प्रवेश सोहळा आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या क्षेत्रात गावा-गावात होत असलेल्या विकास कामावर व  कोरोटे यांच्या कार्यकर्त्यांसोबत आपुलकी भावनेने वागणूकीवर प्रभावित होऊन म.न.से. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंत बनोटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व पदाधिकाऱ्यांचा आमदार सहसराम कोरोटे व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे यांच्या हस्ते व तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजु दोनोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसपक्षात प्रवेश करण्यात आला.

या प्रसंगी गोंदिया जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष वंदना काळे,  जि.प.च्या माजी अध्यक्ष उषा मेंढे,गडमाता ट्रस्टचे अध्यक्ष सावलराम बहेकार,माजी पं. स. सभापती यादणलाल बनोटे, लखनलाल अग्रवाल, निर्दोष साखरे, नितेश शिवणकर, घनशाम नागपूरे, लता दोनोडे, प्रमिला गणवीर,संतोष बोहरे, विमल कटरे, छाया नागपुरे, जितेंद्र बल्हारे, रेखा फुंडे, विना कटरे, सुनिता राऊत, विजय फुंडे, मुस्तापजी कुरेशी, .विजय टेकाम,कैलाश अग्रवाल, युवराज कटरे, खेमराज साखरे, विजय बहेकार,भुमेश्वर मेंढे, ओमप्रकाश ठाकरे, प्रिया शरणागत, रामेश्वर दसरिया तसेच कांग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.