गोंदिया : राज्यात गेल्या एक वर्षापासून विश्वासघातकी अभद्र युतीचे सरकार असून या सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा प्रत्येक मुद्द्यावर विश्वासघात केला आहे. महाराष्ट्रातील या भ्रष्ट सरकारने केवळ ओबीसी समाज आणि बहुजन समाजातील लोकांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. वीज दरवाढ, सरकारी नोकऱ्या कंत्राटी स्वरुपात, सरकारी शाळांचे खाजगीकरण, सरकारी दवाखान्यात औषधे उपलब्ध नसणे, गृहनिर्माण योजनेचे पैसे वेळेवर जमा न होणे, अशा अनेक समस्या आज जनतेला भेडसावत आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष पंकज एस यादव यांनी सरकारवर निशाणा साधताना टेमणी गावच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकार वर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहता टेमणी येथील अनेक तरुणांनी प्रवेश केला. त्यात गुड्डू मारबदे, टिक्कू मारबदे, सुरेन्द्र भलावी, निकेश मेश्राम, लोकेश मारबदे, धर्मेंद्र मारबदे, सुनील मरस्कोल्हे, नरेंद्र जतपेले, दुर्गेश मारबदे, वंश परिहार, अनुज शहारे, मोनू सर्राटे, नितेश मेश्राम, ओमकार टेकाम, सुरेन्द्र जतपेले, सूर्या वाघाडे, अनमोल मारबदे, रुपराज कुंभरे, सुमित सोनवाने, लक्ष्मण नेवारे, इत्यादी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये जिल्हाध्यक्ष पंकज एस यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला आहे.पंकज एस यादव यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून पूर्ण प्रामाणिक आणि निष्ठेने पक्षासाठी काम करण्याचा संदेश दिला.