राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्षपदी विलास चाकाटे यांची निवड

0
7

देवरी-राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केला असल्याने देवरी तालुक्यासह जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदांवर नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अभ्यासु, प्रशासनाशी जवळीक असलेले आक्रमक नेते विलास चाकाटे यांची देवरी तालुकाध्यक्ष पदी बजरंगसिह परिहार प्रदेश उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा निरीक्षक यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुर्णतः बदलून गेले आहे. खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धेय धोरणे व विचारांशी जुडलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पसंती दिली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पवार साहेबा चे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी देवरी तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी भक्कमपणे आज उभे आहेत. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा अभ्यासु व प्रशासनावर त्यांची चांगली पकड असणारे आक्रमक नेते विलास चाकाटे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे.
या निवडीनंतर बोलताना विलास चाकाटे म्हणाले की, आपण मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. नियुक्तीनंतर देवरी तालुक्यात निश्चितच पक्षसंघटन वाढीसाठी कटिबद्ध असून पक्षाची ध्येय – धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल असे यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिह परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळे, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिलीप पनकुले, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, बाबा बैस कार्याध्यक्ष, दिनेश कोरे तालुकाध्यक्ष सडक/अर्जुनी, लताताई गहाणे, मंजुषाताई वासनिक, आरती जागळे, डायमंड डोंगरे, तिरथ येटरे, भुमेश शेंडे, प्रशांत देसाई, घनश्याम रहांगडाले, बालु वंजारी, आशिष येरणे, दिलीप जुळा सरपंच, बिशराम सलामे, अरुण आचले, महेंद्र निकोडे, कविता उईके आदि मान्यवरांची उपस्थिती होती. नियुक्तीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.