६ नोव्हेंबरला राकाँचे प्रदेशाध्यक्ष तटकरे,पालकमंत्री आत्राम गोंदियात

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.04- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले   कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,गोंदिया जिल्हा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रुपालीताई चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चौहान,माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर हे ०६ नोव्हेंबरला गोंदिया जिल्हा पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.०६ नोव्हेबंरला सकाळी ११.०० वाजता एन एम डी महाविद्यालय सभागृहात आयोजित पक्ष कार्यकारिणी बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि ०६ नोव्हेंबरलाच दुपारी ०२.०० वाजता आशीर्वाद लॉन, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांना पक्षातील सर्व सेल व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, सरपंच व ग्रामपंचायत चे सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे.