गोंदिया,-माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अनिल देशमुख हे २२ नोव्हेंबर बुधवारला गोंदियाच्या एक दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. पक्ष संघटना वाढीच्या दुष्टीकोणातुन त्यांचा हा दौरा असून आगामी निवडणुका संदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा सुध्दा करणार असल्याची माहिती आहे.
सुरुवातीला अनिल देशमुख हे विश्राम गृह येथे पदाधिकारी यांच्यासोबत संघटन बांधणी तसेच इतर विषयावर चर्चा करुन नागरीकांच्या भेटी घेतील. नंतर अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीतीत दुपारी २ वाजता ग्रिनलँड लॉन, रिंग रोड टी पॉइंट, गोंदिया येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुध्दा होणार आहे. या बैठकीला माजी खासदार खुशालराव बोपचे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हाचे निरीक्षक बजरंगसिंह परिहार, माजी आमदार तथा भंडारा जिल्हाचे निरीक्षक दिनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, रविकांत बोपचे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहे. या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थीत राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकडे, कार्याध्यक्ष महेश उर्फ मिथुन मेश्राम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.