गोंदिया,दि.30-वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा गोंदियाची सभा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगाव तालुका कार्यकारणी गठित करण्याकरिता आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घेण्यात आली.येणाऱ्या काळात वंचित बहुजन युवक आघाडी अधिक जोमाने काम करून .बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करून वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पोचविण्यासाठी कार्य करणार असल्याची युवक वर्गाने शपथ घेतली.सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष अश्विन डोंगरे,जिल्हा महासचिव ॲड.सूरज रंगारी तसेच उपाध्यक्ष जितू डोंगरे उपस्थित होते.संचालन ॲड. सूरज रंगारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रतीक रामटेके यांनी मानले.