भंडारा,दि.01-महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने २ दिवसाचे शिडर्डी येथे ” ज्योत निष्ठेची – लोकशाहीच्या संरक्षणाची ” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराकरिता भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी शिर्डी येथे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती, होत असलेले शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, उद्योजकांचे हाल व सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्य व सध्या संविधानाचे होत असलेले अवमूल्यन या संबंधीच्या विविध विषयांवर व पक्षसंघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन या विविध विषयांवर विचारांचे मंथन होणार आहे. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेबांसमवेत पक्षाचे जेष्ठ नेते व देशातील काही प्रमुख वक्तयांचे देखील मार्गदर्शन होणार आहे. असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत मध्ये जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी दिली.यावेळी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, तालुका अध्यक्ष ईश्वर कडंबे, नितेश मारवाडे बबन भुते, यशवंत भोयर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते