राष्ट्वादी काँग्रेस (अजित पवार गट) ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पदी किशोर तरोणे

0
7

अर्जुनी मोर.=राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या अजित पवार गटाच्या वतीने नुकत्याच राज्य ते स्थानीक पातळीवरील विवीध विभागातील पक्षाच्या नियुक्त्या करून राज्यभर पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश ओबिसी सेल गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी माजी युवक राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर चिंतामण तरोणे यांची नियुक्ती करण्यात आली.
ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा राष्ट्रिय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राज्यात पक्ष बळकीकरणासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने त्यांची नियुक्त करीत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आज (ता.२७) जाहीर केले.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपने पार पाडून तळा गळातील ओबीसी समाजातील युवकांना पक्षाची विचारधारा समजावून ज्यास्तीत ज्यास्त युवकांना पक्षसंघटनेत सामावून घेतले जाईल.या माध्यमातून समाजाचे प्रश्न राज्य पातळीवर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किशोर चिंतामण तरोने यांनी दिली.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय देशाचे नेते प्रफुल पटेल, राजेंद्र जैन गंगाधर परशुरामकर दिले आहे.त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते तथा ओबीसी समाजातील युवक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.