शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राकाँपाचे आमरण उपोषण सुरू

0
16

अर्जुनी मोर : शेतकऱ्यांना कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीला घेऊन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमरण उपोषण २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पासून अर्जुनी मोरगाव येथील लाखांदूर चौकात केले आहे. उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम बसलेले आहेत.
सविस्तर असे की, गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त आहे. या भागातील बहुतांश शेतकरी धान पिकाची लागवड करतो. या धान पिकाला सिंचन सुविधेसाठी कृषी वीज पंपाची सोय ऊपलब्ध आहे मात्र कृषी वीज पंपांना रात्रीच्या सुमारास केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक असून जीव मुठीत घेऊन शेती करावी लागत असल्याचा आरोप केला आहे.
तथापि, जंगलालगत असलेल्या शेतशिवारात कृषी पंपांना रात्रीचे प्रहरी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जंगल मार्गाने शेतात ये – जा करतांना मनस्ताप करावा लागतो. ८ तासांत शेतीला पुरेसे सिंचनही होत नाहीत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रात्री सिंचनासाठी शेतात गेल्यानंतर वन्य प्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी या भागात घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेऊन रात्री अपरात्री शेतात ये जा करावी लागते.
कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी ८ जानेवारी रोजी वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने निषेध व्यक्त करीत रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला. अजूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने येत्या २८ जानेवारी पासून आमरन उपोषणराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम हे उपोषणावर बसलेले आहेत त्यांच्या या उपोषणाला अर्जुनी मोरगाव तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल लंजे यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी गोंदियाचे जिल्हा सचिव महेंद्र निखाडे विलास चाकाटे मंजुषाताई वासनीक विवेक कापगते प्रवीण लंजे व इतर शेतकऱ्यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे.