रोहित पवार यांच्या समर्थनात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निदर्शने

0
2

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व युवकांच्या मनात घर करून त्यांना रोजगाराच्या प्रश्न शासनाला सडेतोळपणे जाब विचारणारे आमदार रोहित पवार यांच्या वर ईडी मार्फत तिसर्‍यांदा चौकशीचा घाट घालण्यात आला. त्यामुळे रोहित पवारांचा आवाज कुठं तरी केंद्रातील सरकारचे षडयंत्र सुरु असल्याने या ईडीच्या मध्यामातून  भाजपला फायदा पोहचविण्यासाठी रोहित पवार यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने केल्या जात आहे.
या विषयावर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर  या तालुक्यात मोठया प्रमाणात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ईडीच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यांनी  ईडीचा विरोध करत निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी तहसीलदार यांना याप्रसंगी निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना दिलीप सोनुले महासचिव, सौ.अनिता गजभिये महिला जिल्हाध्यक्ष, अजय मेश्राम विधानसभा अध्यक्ष, कुनाल पवार तालुका अध्यक्ष, नरहरी वरकडे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती, राजेश्वर शिवरकर विमुक्त भटक्या (भोई समाज) अध्यक्ष, घनश्याम वंजारी पवनी तालुका युवक अध्यक्ष, मुनिश्वर काटेखाये चिचाळ, दिगांबर मोहरकर जुनोना, नितीन तलमले, विलास झोडपे, राहुल काटेखाये, रूपचंद लिंगायत, शंकर धनविजय, प्रकाश धनविजय, पवन श्रीराम, प्रमोद पडोळे, हरीश ठवरे, पवनी शहर अध्यक्ष गौरव पडोळे,  राकेश हटवार, मयुर जनबंधु, सौ. वंदनाताई शेंडे, यशवंत मोहरकर,  वैभव भोंदले, शोभिवंत गेडेकर,  भारत मेश्राम,  चेतन बावनकुळे, मिथुन मारबते, राहुल जनबंधु, मिथुन आमदे, सुनील शेंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.