अमळनेर तालुका क्रीडा संकुल बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

0
1

जळगाव,दि.२ : अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भिल, राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आर मध्ये साकार होत‌ आहे. २०१० रोजी या क्रीडा संकुलास मान्यता मिळाली. क्रीडा संकुलास ४ कोटी मंजूर झाले आहेत. सध्या १ कोटींच्या प्राप्त निधीतून या क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजूरांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला