उपराष्ट्रपतीं धनखडांनी दिला वर्षा पटेलांना “लगे रहो”चा संदेश…..

0
13

आपण अध्यक्षा आहात..नारी शक्ती विधेयक आपल्या सोबत आहे,लागून रहा-उपराष्ट्रपती धनखड

गोंदिया(खेमेंद्र कटरे)– येत्या काही दिवसांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.त्या रणधुमाळीमध्ये केंद्रातील विद्यमान सरकारने महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरीता नारी शक्ती वंदन विधेयकाचे महत्व पटवून देण्याचे काम हाती घेतले आहे,नव्हे तर निवडणुकीत 33 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचाही निर्णय घेतला.त्याकडे बघतच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज गोंदियात संसदेने पारीत केलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाचे कौतुक करतांनाच राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना शिक्षण क्षेत्रातील कामासोबतच सामाजिक कार्यात आपल्या धर्मपत्नीचे असलेले योगदान विसरुन चालणार नाही असे म्हणत वर्षा पटेलांना आपण संस्थेच्या अध्यक्षा आहात,मागे राहून चालणार नाही आपण लागून राहा.आत्ता तुम्हाला पुढच्या काळात पुढे यायचे असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यातच भाजपच्या गोटातूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार्या जागेमधून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवार राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामध्ये प्रफुल पटेलांच्या धर्मपत्नी वर्षा पटेलांचे नाव प्राधान्य क्रमावर असून वर्षा पटेल खरंच नारी शक्ती वंदन विधेयकाच्या या मतदारसंघातील पहिल्या राजकीय लाभार्थी ठरतात काय याकडे उपराष्ट्रपती धनखड यांच्या वक्तव्यानंतर मतदारसंघातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

संसदेत नारी शक्ती विधेयक पारीत झाल्यानंतर येत्या काळात संसदेसह  राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर नारीशक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात  ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने विकसित भारताची वाटचाल अधिक मजबुतीने होईलअसा विश्वास व्यक्त करीत महिलांचे मोलाचे योगदान राहणार असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले होते.संसदेच्या नव्या वास्तूत  केंद्र शासनाने नारी शक्ती वंदन विधेयक पारित करुन राजकीय क्षेत्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे येत्या काळात संसदेत व विविध राज्यांच्या विधीमंडळात महिलांचा सहभाग वाढेल व विकसित भारताच्या वाटचालीत त्यांची महत्वाची भूमिका ठरणार असल्याने वर्षा पटेलांनी याकडे डोळेझाक करुन चालणार नसल्याचे वक्तव्य केल्याने राजकारणातील नेत्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.