कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

0
3

वाशिम,दि.23ः- जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त करतांना ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे.
त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी असल्याची भावना व्यक्त केली.