ईव्हीएम विरोधात उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा

0
3

काँग्रेस पक्षाचे व आंबेडकरवादी पक्षांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी

देवरी, दि. २४- देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा कडून आज ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन विरोध नोंदविला आहे. जिल्ह्यात प्रथमच ईव्हीएम विरोधात भव्य असा आंदोलन नागरिकांना पाहवयास मिळाला आहे. नागरिकांनी स्वयपुरते ने आंदोलनात सहभागी होताना दिसले. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे, तालुका महिला अध्यक्ष आरती जागळे, भारत मुक्ती मोर्चा चे वंदना डोंगरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या व भारत मुक्ती मोर्चा वतीने (दि. २३ ) देवरी उपविभागीय कार्यालयांवर ईव्हीएम विरोधात मोर्चा काढून आगामी निवडणुकीत ईव्हीएम चा वापर करू नये या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
जिल्यालगत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत तफावत दिसून येत असल्याने आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुक ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दुपारी १.०० वाजता बौद्ध विहार पासून सुरुवात करण्यात आले. राणी दुर्गावती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी देवरी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी ईव्हीएम हटाव-देश बचाव आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा महिला अध्यक्ष मंजु डोंगरावर, तालुका महिला अध्यक्ष आरती जागळे, भारत मुक्ती मोर्चाचे वंदना डोंगरे, गोंदिया जिल्हा महासचिव तिरथजी येटरे, बालभाऊ वजारी यांनी उपस्थितांना संबोधन केले. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम हे यंत्र महत्वपूर्ण आहे. परंतु, अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत घोळ असल्याचा आरोप केल्याने आजघडीला ईव्हीएम वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. देवरीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने आक्षेप घेत ईव्हीएम हटाव-देश बचाव अशी मागणी करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत येणाऱ्या निवडणुकीत ईव्हीएम चा वापर करू नका – फक्त मतपत्रिकांचा वापर करा असा सक्त इशारा दिला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा महिला अध्यक्ष मंजु डोंगरावर, जिल्हा उपाध्यक्ष बालुभाऊ वजारी, दिलीप जुळा, जिल्हा महासचिव तिरथजी येटरे, प्रतिक लाजेवार, गोंदिया विधानसभा अध्यक्ष शेखरभाऊ चामट, आमगांव तालुकाध्यक्ष भुपेश शेंडे, बिसरामजी सलामे, जिल्हा सचिव महेंद्र निकोडे, तालुकाध्यक्ष विलास चाकाटे, तालुका महिला अध्यक्ष आरती जागळे, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र शहारे, सडक/अर्जुनी तालुका महिला अध्यक्ष रुपाताई गिर्हेपूंजे, तालुका युवक अध्यक्ष अरुण आचले, महासचिव विनोद रोकडे, माजी सरपंच मनोहर राऊत, संदेश मेश्राम, सतीश आचले, योगराज शिवनकर, बैजुराम काळसर्पे, काशिराम शहारे, राजकुमार बन्सोड, प्रशांत देसाई, सिता मेश्राम, सुलोचना वालदे, दिक्षा वालदे, देवांगना वालदे, सुमत्रा धानगुण, सुरेखा वालदे, श्रद्धांनजली वालदे, प्रमिला प्रधान, मंगला वालदे, सकुंतला वालदे, चित्रलेखा गजभिये, मोनिका वालदे, हिना राऊत, आंदोलनात मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.