मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शिवाजी हायस्कूल जिल्ह्यातून प्रथम

0
2

*”मुख्यमंत्री माझी शाळा

 देवरी, दि.24 -स्थानिक देवरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व शासकीय शाळांचे केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय प्राप्त अहवालानुसार जिल्हा मुल्यांकन समिती मार्फत मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये खाजगी अनुदानित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

त्याबद्दल शाळेतील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व पर्यवेक्षिय यंत्रणेचे अभिनंदन मा. श्री. झामसिंगजी येरणे, अध्यक्ष, कृ. स. तं. शि. सं. देवरी, संस्थेचे सचिव मा. श्री. अनिलकुमार येरणे यांनी केले आहे. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.