सालेगाव जलाशयात वाघनदीचे पाणी सोडण्याची शासन दरबारी मागणी

0
3

■ आमदार कोरोटे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

देवरी,ता.२८: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी तालुक्यातील सालेगाव जलाशल प्रकल्पात वाघनदीचे पाणी सोडण्यात यावे. या उपसा सिंचन योजनेसाठी त्वरीत सर्व्हे करण्याचे निर्देश जलसंधारण विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना  देवून या जलाशयचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी सहसराम कोरोटे यांनी सोमवार (दि.२६ ) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेत निवेदनातून केली आहे.

 निवेदनात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, देवरी तालुक्यातील सालेगावं जलाशल प्रकल्पात वाघनदीचे पाणी सोडण्याकरीता या उपसा सिंचन योजनेतून त्वरीत सर्व्हे करण्याकरीता जलसंधारण विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात यावे आणि या जलाशयचे काम पूर्ण करण्यात यावे. कारण या जलाशयात उपसा सिंचन योजनेतून सर्व्हे करून वाघ नदीचे पाणि सोडल्यास या जलाशयाच्या परिसरातील सुमारे दहा-बारा गावातील शेतक-यांना सिंचनाची सोय होईल. येथील शेतक-यांच्या दृष्टीने हा जलाशय अत्यंत महत्वाचा आहे. तरी या जलाशयात वाघ नदीचे पाणा सोडण्याकरीता उपसा सिंचन योजनेतून सर्व्हे करण्याकरीता जलसंधारण विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना त्वरीत निर्देश देवून या जलाशयचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेवून चर्चा केली.